सावंतवाडीत रंगणार ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटचा संग्राम…

302
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अनिल सावंत; मुंबई येथील युवर चॉइस क्रिकेट ॲकॅडमीचे आयोजन…

सावंतवाडी ता.०३:

मुंबई येथील प्रसिद्ध युवर चॉइस क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर उदया पासुन चार दिवसाचे ट्वेंटी-ट्वेंटी सामने आयोजित करण्यात आले आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी साडेनऊ वाजता सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते होणार आहे.अशी माहिती युवर चाॅईस क्रिकेट ॲकॅडमीचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली.
यावेळी सावंत म्हणाले,उद्यापासून चार दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत.यासाठी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय संघ, वेंगुर्ला स्पोर्ट्स संघ, तालुका क्रिकेट असोसिएशन वेंगुर्ला संघ, मॉर्निंग बॉईज क्रिकेट असोशियन सावंतवाडी, एडवोकेट सिंधुदुर्ग संघ, बांदा महाविद्यालय व गोवा येथील संघ अशी एकुण आठ संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मंदार नार्वेकर, कार्याध्यक्ष बाळ चोडणकर, सचिव उत्तम वाडकर, राजेश केणी, राहुल रेगे आदी उपस्थित राहणार आहेत.यावेळी सर्वांनी सामन्यांचा आनंद घ्यावा,असे आवाहन श्री.सावंत यांनी केले आहे.

\