गुन्हे अन्वेषण शाखा व वैभववाडी पोलिस यांची संयुक्त कारवाई….
वैभववाडी ता.०३ :
वैभववाडी बाजारपेठेतील मोबाईल शॉपी चोरी प्रकरणातील आरोपी चंदन रामू चौहान वय २७ रा. अदमगड, उत्तरप्रदेश याला गुन्हा अन्वेषण विभाग ओरोस व वैभववाडी पोलिसांनी सयुंक्त कारवाई करून अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी केली.
आदमगड उत्तर प्रदेश येथील सेन्ट्रीगचे काम करणारा तरुण कोकिसरे बेळेकर वाडी येथे काम करत होतो. चोरी केलेल्या मोबाईलच्या संकेत क्रमांकावरून आरोपीला तांब्यात घेतले आहे. वैभववाडी बाजारपेठेतील हॅलो फ्रेंड मोबाईल शॉपी चार दिवसापूर्वी अज्ञात चोरट्याने मध्यरात्री फोडली होती. त्यामध्ये सुमारे एक लाख रुपये पेक्षा जास्त किमतीचे बावीस मोबाईल पीस चोरून नेले होते. याबाबतची खबर मोबाईल शॉपी शॉपीचे मालक इम्तियाज काझी रा. तिथवली यांनी वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीसउपनिरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. आरोपी कोकिसरे बेळेकरवाडी येथे सेंट्रींग काम करत होता. त्या ठिकाणाहून गुन्हा अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक सुभाष खादारे, आशिष गंगावणे, संकेत खाडे, स्वप्नील तोरस्कर, रवी इंगळे, योगेश राऊळ, रविकांत अडुळकर, राजू जामसंडेकर यांनी कारवाई केली.