उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू;ओळख पटवण्याचे कार्य पोलिसांकडून सुरु…
वैभववाडी ता.०४:
येथील कोकिसरे रेल्वे फाटकापासून कणकवलीच्या दिशेने काही अंतरावर असलेल्या रेल्वे पुलाखाली अज्ञात ५५ वर्षीय तरुण जखमी अवस्थेत आढळून आला आहे.दरम्यान त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबतची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आज सकाळी संबंधित इसम जखमी अवस्थेत पडलेला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला.त्यांनी तात्काळ ही माहिती वैभववाडी पोलिसांना दिल.तर रुग्णवाहिका बोलून उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू केले.मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.