पदाला धोका पोचण्याच्या भीतीपोटीच भाजप नगरसेवकांकडून आरोप ; आमदार वैभव नाईक…

275
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू ; लवकरच सत्य बाहेर येईल…

मालवण, ता. ४ : नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे गेल्या अडीच वर्षातील चांगले काम बघितल्यानंतर काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भविष्यात आपल्या पदाला धोका निर्माण होईल अशी भीती निर्माण झाल्यानेच भाजपच्या नगरसेवकांकडून खोटे आरोप करण्यात येत आहे. नगराध्यक्षांचे काम हे चांगले असल्यानेच आपल्यासह, शिवसेना नगरसेवक, मालवणवासीय त्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी येथील शाखेस भेट देत विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, पंकज सादये, नितीन वाळके, बाबी जोगी, तृप्ती मयेकर, सेजल परब, गणेश कुडाळकर, महेंद्र म्हाडगुत, नंदू गवंडी, प्रवीण रेवंडकर, नीलम शिंदे, विद्या फर्नांडिस, पुनम चव्हाण, तपस्वी मयेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नगरपरिषदेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य लवकरच उजेडात येईल असेही आमदार नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

\