सावंतवाडीसह, आंब्रड, बांदा निवडणुकीत भाजपचाच विजय निश्‍चित…..

2

प्रमोद जठार यांची ग्वाही : दोन दिवसांत सावंतवाडी नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरेल….

कणकवली, ता.४ :
सावंतवाडी नगराध्यक्ष, आंब्रड जिल्हा परिषद आणि बांदा सरपंच निवडणुकीत भाजपचेच उमेदवार विजयी होतील असा विश्‍वास भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज व्यक्त केला. सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून चार जण इच्छुक आहेत. पुढील दोन दिवसांत यातून अंतिम उमेदवार निश्‍चित होईल असेही ते म्हणाले.
 येथील भाजप कार्यालयात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, डामरेचे माजी सरपंच चंद्रहास सावंत उपस्थित होते.
 श्री.जठार म्हणाले, शिवसेना पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करून भाजपच्या स्वबळाची वाटचाल मोकळी केली आहे. आता यापुढच्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावरच लढू आणि भाजपची ताकद दाखवून देणार आहोत. सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी अन्नपूर्णा कोरगावकर, अ‍ॅड.भांबुरे, संजू परब आणि संदीप कुडतरकर हे चौघे इच्छुक आहेत. पुढील दोन दिवसांत यातून एक अंतिम उमेदवार निश्‍चित होईल. त्याबाबतचा निर्णय कोअर कमिटी घेणार आहे. आंब्रड जि.प.मतदारसंघात भाजपचे उमेदवार श्री.लॉरेन्स मान्येकर यांच्या विजयासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत असल्याचेही श्री.जठार म्हणाले.

1

4