शिवसेना महाराष्ट्राच्या विकासाची माती करतेय…..

2

प्रमोद जठार यांची टीका : आढावा घेण्याच्या नावाखाली प्रकल्पांना टाळे….

कणकवली,ता.०४:
गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने विकासाची घौडदौड राखली होती. रोजगार निर्मिती देणार्‍या अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. पण आढावा घेण्याच्या नावाखाली शिवसेना हे प्रकल्प बंद पाडतेय. महाराष्ट्राच्या विकासाची माती करतेय अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली.
 श्री.जठार म्हणाले, मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी संजय राऊत यांनी सोन्यासारखी शिवसेना सिल्वर ओकवर चांदीच्या भावाने गहाण ठेवली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या टेकूवर शिवसेनेने सरकार स्थापन केलेय. हे पण सरकार विकासाची माती करत आहे. हजारो रोजगार निर्मिती करणारा नाणार प्रकल्प त्यांनी रद्द केलाय. एक लाख कोटींची गुंतवणूक असणार्‍या बुलेट ट्रेन प्रकल्पाला त्यांनी टाळे लावलेय. समृद्धी महामार्ग देखील बंद करण्याच्या तयारीत ते आहेत.
मध्यावधी निवडणुका अटळ
राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तीन तिघाडा काम बिघाडा सरकार फार काही चालणार नाही. या तिघांनी वर्षभर हनीमुन एन्जॉय करावा. आम्ही कार्यकर्त्यांना मध्यवती निवडणुकीसाठी तयार राहा असेच आदेश दिले असल्याचे श्री.जठार म्हणाले.

1

4