मालवण पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी उद्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार…

2

भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची माहिती ; भाजप नगरसेवकांचे उपोषण सुरूच…

मालवण,ता.४: मालवण पालिकेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी उद्या कुडाळ येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान सकाळपासून भाजप नगरसेवकांनी सुरू केलेले उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे श्री. कुशे यांनी स्पष्ट केले.
मालवण पालिकेत लाच स्विकारल्याच्या प्रकरणाची चौकशी समिती नेमून चौकशी करावी तसेच नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गटनेते गणेश कुशे यांच्यासह भाजप नगरसेवकांनी पालिका कार्यालयासमोर सकाळपासून उपोषण सुरू केले आहे. यात आज रात्री भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तक्रारीसाठी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात यावी असे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यानुसार गुरुवारी दुपारी कुडाळ येथील लाचलुचपत विभागाकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रार करण्यात येणार असल्याचे श्री. जठार यांनी स्पष्ट केले.

2

4