सावंतवाडीत आयोजित क्रिकेट संग्रामात मुंबईच्या संघाची बाजी…

2

सावंतवाडी ता.०५:

मुंबई येथील युवर चॉइस क्रिकेट ॲकॅडमीच्या माध्यमातून येथील जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत तब्बल चार संघावर मात करत आज मुंबई क्रिकेट असोसिएशन संघाने जोरदार कामगिरी बजावली आहे.यात गोवा क्रिकेट असोशियन, सावंतवाडी वकील संघटना, सावंतवाडी सीनियर व वेंगुर्ला बॉईज संघ या चार टिमचा त्यांनी पराभव केला आहे.दरम्यान उद्याचे सामने मुंबई क्रिकेट असोसिएशन ,वेंगुर्ला क्रिकेट क्लब आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्यात खेळविले जाणार आहेत.
यावेळी गुणलेखक म्हणून राजेश केणी तर पंच म्हणून प्रमोद ठाकूर यांनी काम पाहिले.तर उपस्थित खेळाडूंना युवर चॉइस क्रीकेट अकॅडमीचे अनिल सावंत यांनी मार्गदर्शन केले.

9

4