करुळ गावठण अ प्रशालेत ‘वॉटर बेल’ संकल्पनेचा शुभारंभ…..

129
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.०६ : 

विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्या व‌ वाढत्या तापमानात शरिराला पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन वि.मं. करूळ गावठण अ प्रशालेत वाॅटर बेल या संकल्पनेचा शुभारंभ पार पडला.
शालेय लहान विद्यार्थी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहाताना दिसत नाहीत. परिणामी बऱ्याचवेळा विद्यार्थी आजारी पडत असतात. शालेय परीक्षांच्या काळात तर आजारी पडण्याच्या कारणामुळे हुशार होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. कमी मिळालेल्या गुणांमुळे त्यांची मानसिकता ढासळते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या आरोग्याकडे व समतोल आहाराकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच शरिरातील आवश्यक पाण्याचे प्रमाण, पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्या याची माहिती शिक्षक नवनाथ सगरे, ताई व्हनाले यांनी विद्यार्थ्यांना दिली.

\