करुळ येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…..

113
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी, ता.०६ :

दरवर्षी प्रमाणे करुळ गावठण येथील दत्त मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव ११ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दि ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक, व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त देवस्थान मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ८ ते ९ या कालावधीत तालुका मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी आरोग्यशिबीर संपन्न होतात आहे. गावचे सुपुत्र, फुफ्फुसरोग तज्ञ डॉ. प्रशांत कोलते व स्त्री रोग तज्ञ डॉ. दर्शना कोलते या शिबीराला उपस्थित राहून मार्गदर्शन व रुग्ण तपासणी करणार आहे. सायंकाळी ४ वा. दत्त हरिनाम गजर, सायंकाळी ६ वा. दत्त जन्मोत्सव व दर्शन, रात्री 9 वा. पालखी मिरवणूक, रात्री १० वा. बक्षिस वितरण व सत्कार, रात्री ११ वा रंग मराठी कलेचा हा बहारदार कार्यक्रम दिग्दर्शक रमेश वारंग यांचा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला परिसरातील दत्त भक्त व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

\