करुळ येथे ८ व ९ रोजी तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन….

174
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता.०६

दत्त प्रगती कला क्रीडा मंडळ करूळ गावठण आयोजित तालुका मर्यादित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक ८ व ९ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ११ हजार १११ व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला ७ हजार एक रुपये व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर आणि शिस्तबद्ध संघ यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील संघांनी या क्रिकेट स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विकास कोलते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिन कोलते 9403230933, जयेंद्र कोलते 9423212234, सुशांत कोलते 9834179652, योगेश कोलते 9403072055, कमलाकर साटम 9404395076, यांच्याशी संपर्क साधावा.

\