कोकणातील विकास प्रकल्पांना ठाकरेंचा खोडा……

155
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आंदोलन करण्याचा प्रमोद जठार यांचा इशारा….

कणकवली, ता.०६ : 
ज्या कोकणाने शिवसेनेला सर्वाधिक आमदार दिले. त्याच कोकणातील विकास प्रकल्पांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देऊन खो घातला आहे. मूर्ख शेखचिल्लीप्रमाणे ठाकरेंचे कामकाज दिसतेय. शिवसेनेच्या झाडाला ज्या कोकणने वाढवले. त्याच झाडाच्या फांद्या तोडायला ठाकरे निघाले असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली.
 येथील भाजप कार्यालयात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये उपस्थित होते. श्री.जठार म्हणाले, शिवसेनेला रत्नागिरीतून चार, सिंधुदुर्गातून दोन तसेच ठाणे, रायगड आणि मुंबईतून सर्वाधिक आमदार मिळाले. याच आमदारांच्या पाठबळावर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होता आले आहे. मात्र कोकणातील विकास प्रकल्पांना टाळे लावण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे. प्रकल्प बंद करणे खूप सोपे असते. पण प्रकल्पांना मान्यता मिळविण्यासाठी प्रचंड कालावधी लागत असतो. त्यामुळे विकास प्रकल्प बंद करण्याआधी त्यांची समीक्षा करा. पण कोकणविकासाच्या आड येऊ नका. कोकणातील विकास प्रकल्पांवरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी न उठवल्यास भाजपतर्फे आंदोलन छेडणार असल्याचेही श्री.जठार यांनी यावेळी जाहीर केले.
\