राणेंच्या बाजूला उभे राहा; म्हणजे कोण कोकरू ते समजेल…..

2

जठारांचा दीपक केसरकरांना टोला : शिवसेना पक्ष सोनियांकडे गहाण….

कणकवली, ता.०६:
कणकवलीचे आमदार नीतेश राणे हे कोकरू असल्याची टीका माजी पालकमंत्री दीपक केसरकर करत आहेत. पण काही वेळ त्यांनी नीतेश राणेंच्या बाजूला उभे राहून पाहावे म्हणजे कोण कोकरू आहे ते समजून येईल असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज लगावला. तसेच माझ्यावर पक्ष गहाण ठेवल्याची टीका करणार्‍या केसरकरांनी काही वर्षापूर्वीच आमदारकीसाठी आपली निष्ठा राणेंकडे गहाण ठेवली होती. आता तर संपूर्ण शिवसेना पक्षच सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याकडे गहाण ठेवला गेलाय असेही ते म्हणाले.
 जठारांनी भाजप पक्ष संघटना राणेंकडे गहाण ठेवली असल्याची टीका श्री.केसरकर यांनी केली होती. त्याला आज श्री.जठार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, आमदारकीसाठी केसरकरांनीच काही वर्षापूर्वी आपली निष्ठा आणि स्वाभिमान राणेंकडे गहाण ठेवला होता. आता तर त्यांच्या पक्षप्रमुखांनीच शिवसेना पक्ष पवार-गांधींच्या चरणी अर्पण केलाय. त्यामुळे केसरकरांनी आमच्यावर नाहक आरोप करू नयेत. तसेच राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान आम्ही कायमच ठेवणार आहोत.

6

4