ओटवणे-गावठणवाडी येथे भर दिवसात घरफोडी…

240
2
Google search engine
Google search engine
Google search engine

५० हजाराची रोकड लंपास;तपासासाठी पोलिस घटनास्थळी दाखल…

सावंतवाडी ता.०६:

ओटवणे गावठणवाडी येथील बांधकामचे निवृत्त लिपिक बाबल ओटणेकर यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करत आतील सुमारे पन्नास हजाराची रोकड लंपास केली आहे.ही घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली .याबाबत श्री.ओटवणेकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.त्यानुसार अधिक तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोते घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की ओटवणेकर हे कामानिमित्त आज सकाळी सावंतवाडी आले होते.दरम्यान ते दुपारी उशीरा घरी परतले असता घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.घरात ठेवलेल्या कपाटातील ही रक्कम लंपास करण्यात आली आहे.भर दिवसात चोरी झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पुन्हा एकदा खळबळ पसरली आहे.

\