माजगाव नंदनवन काॅलनीत चोरी,४० हजाराचा मुद्देमाल लंपास…..

194
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०६:

ओटवणे येथे चोरी झालेली घटना ताजी असताना आज येथील नंदनवन कॉलनी राहणाऱ्या मंगेश जाधव यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.
या चोरीत तब्बल 40 हजारांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा सुरू केला आहे. चोरीत बारा हजार रुपये रोकड,दीड तोळ्याची चैन व अंगठ्या असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधून पुढचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व मागच्या दराने तो पळून गेला याबाबत सौ जाधव घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला

\