इन्सुली डोबाचीशेळ येथील डांबर प्लांट विरोधात ग्रामस्थ आक्रमक….

260
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तहसील कार्यालयासमोर उपोषण; न्याय द्या,अन्यथा माघार नाही महसूलला इशारा…..

सावंतवाडी/निखिल माळकर, ता.७:
इन्सुली डोबाचीशेळ येथे हे सुरू असलेल्या डांबर प्लांट मुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे अनधिकृत रीत्या सुरु असलेला हा डांबर प्लांट तात्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी आज तेथील ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.
दरम्यान जोपर्यंत आम्हाला योग्य निर्णय दिला जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी महसूल प्रशासनाला दिला. यावेळी आपण संबंधित प्लांट मालकाशी चर्चा करू तसेच ग्रामस्थ व मालक यांच्यात बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.

यावेळी सरपंच पूजा पेडणेकर, उपसरपंच सदाशिव राणे,संजय राणे फिलिप रॉड्रिक्स, सुंदर आरोसकर, नारायण राणे, सचिन देसाई, काका चराठकर, अशोक दळवी, बाळा आरोसकर, सचिन सावंत,नागेश राणे, चंद्रकांत मोरजकर, लक्ष्मण राणे, गणपत कुडव,साईप्रसाद कल्याणकर, उल्हास सावंत आदी उपस्थित होते

\