पोलिस कर्मचाऱ्याला क्लिनचीट देण्यासाठी पोलिस अधिका-याने मागितली लाच…..

2

राज्यपालांकडे तक्रार; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस दलात खळबळ….

सिंधुदुर्गनगरी ता,०७:
लाच प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला चौकशीत “क्लीनचिट” देण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच मागितल्याचा आरोप खुद्द सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस उपअधीक्षकांवर झाला आहे.
याप्रकरणी संबंधित फिर्यादी व लाच स्वीकारल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेला पोलीस कर्मचारी राजेंद्र उर्फ राजा राणे यांनी राज्यपालांकडे तक्रार केली आहे.
याबाबत त्यांनी सर्व पुराव्यांनुसार एका खाजगी वाहिनीकडे हा प्रकार उघड केला. त्यात फोन रेकॉर्डिंगचे पुरावे देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणात बांदा येथील “देसाई” नामक एका पोलिसा कडून आपण २५ हजार रुपये घेतले अशी कबुली खुद्द पोलीस उपअधीक्षक फोन मध्ये देत आहेत त्यामुळे या सर्व प्रकारात नेमके काळे बेरे काय याची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.
दोडामार्ग येथे कर्तव्य बजावत असताना राजेंद्र उर्फ राजा राणे यांना ६ जून रोजी पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. वाळूचा पकडलेला डंपर सोडण्यासाठी त्यांनी ही लाच मागितल्याचा त्यांच्यावर होता दरम्यान त्यांची सद्यस्थिती प्रशासकीय चौकशी सुरू आहे या प्रशासकीय चौकशीत क्लीनचिट देण्यासाठी त्यांच्याकडून ही लाच मागितल्याचा राणे यांचा आरोप आहे दरम्यान यामुळे ची सर्व पुरावे त्यांनी दिले आहेत तसेच या प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे

13

4