Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वैभववाडी, ता.०७:
श्रीदत्त साई देवालय ओम आदिनाथ दत्त सांप्रदाय अध्यात्मिक मठ खांबाळे येथे बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त सकाळी ८ ते ११ दत्त साई पादुका पूजन, होमहवन, पुरोहित विलास प्रभू कोकिसरे यांचे सकाळी ११ ते १ वा. प्रवचन विनोद गोखले महाराज नाधवडे यांचे १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ६ नामस्मरण जन्मसोहळा प्रवचन नामदेव महाराज यांचे होणार आहे, नंतर तीर्थप्रसाद रात्री ७ वाजल्यानंतर भजन, प्रवचन, कीर्तन, व रात्री ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळा दत्त मंदिर ते आदिष्टी मंदिर अशी काढण्यात येणार आहे. या निमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दास नामदेव महाराज खांबळे व दामोदर सावंत जोगेश्वरी मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.