आता सावंतवाडीत विजयोत्सव साजरा करू…

2

महेश सारंग यांचा विश्वास; बांद्यातील जनतेचे मानले आभार…

सावंतवाडी ता.०९: बांद्याचा गड जिंकला आता सावंतवाडीत नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष बसवून या ठिकाणी ३० डिसेंबरला विजयोत्सव साजरा करू,असा दावा भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.बांद्याच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि अन्य नेत्यांनी त्या ठिकाणी प्रतिष्ठेचा मुद्दा केला.मात्र पुन्हा एकदा बांदयाच्या जनतेने भाजपवर विश्वास ठेवून त्यांना जागा दाखवून दिली,असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बांदा येथील पोटनिवडणुकीच्या यशानंतर श्री.सारंग यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.यावेळी संजू परब,अक्रम खान,मनोज नाईक, रेश्मा सावंत, जावेद खतीब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री.सारंग म्हणाले,बांदा निवडणुकीत शिवसेनेकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती.मात्र या ठिकाणी बांद्यातील जनतेने योग्य तो विश्वास आमच्यावर दाखवला,अक्रम खान यांच्या रुपाने पुन्हा एकदा बांद्याला विकास कामे करणारा चेहरा मिळाला आहे.त्यामुळे भाजप जातीचे राजकारण करीत नाही,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.आता येणाऱ्या काळात सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्ही ३० डिसेंबरला विजयोत्सव साजरा करणार आहोत.त्यादृष्टीने आमचे विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत.असे श्री.सारंग म्हणाले.यावेळी बांदा व सावंतवाडी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सरपंच अक्रम खान यांचे अभिनंदन केले.

6

4