जनशिक्षण संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे आयोजन…
वेंगुर्ले.ता.९: जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने वेंगुर्ला येथे युवकांना स्वयंरोजगार प्राप्त करून देण्याच्या प्रमुख उद्देशाने कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार पुरस्कृत इलेक्ट्रिशियन कम वायरमन कोर्स चे पाच महिन्यांचा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जनशिक्षण संस्थेचे कार्यक्रम अधिकारी एस. एस.मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर, प्रशिक्षक सचिन धोंड, किरण राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. मेस्त्री यांनी बोलताना जनशिक्षण च्या कामाचा आढावा घेताना या प्रशिक्षणातून युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत त्यांना जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून केली जाईल असे आवर्जून सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार किरण राऊळ यांनी मानले.