दीपक केसरकर; माजी नगराध्यक्ष साळगावकर यांच्याशी चर्चा सुरू,सामंत….
सावंतवाडी ता.०९:
नगराध्यक्षबबन साळगावकर यांनी राजीनामा दिला नसता तर सावंतवाडीत पोट निवडणूक लागली नसती.उमेदवार नेमका कोण देता येईल याची चर्चा महाविकास आघाडीचे वरिष्ठ घेतील.शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी या तीनही पक्षात प्रत्येकी तीन चेहरे आहेत.त्यांच्याशी चर्चा करून १२ तारखेला उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.माजी नगराध्यक्ष साळगावकर यांच्याशी सुद्धा चर्चा सुरू आहे.अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.दरम्यान आपण साळगावकर यांच्याशी चर्चा केली.तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णया सोबत आपण राहीन,असा त्यांनी शब्द दिला आहे,असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.
तत्पूर्वी नगरपरिदेच्या नगराध्यक्ष पोट निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी शिवसेना आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज बैठक पार पडली.या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत,माजी आमदार पुष्षसेन सावंत,राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत,साईनाथ चव्हाण,सोमनाथ टोमके,प्रकाश जैतापकर,दादा परब,राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य उदय भोसले,सुरेश गवस,शिवाजी घोगळे,प्रफुल्ल सुद्रिक, गुरुदत्त कामत, दिलीप नार्वेकर,नीता गावडे,महेंद्र सांगेलकर, अबिदी मेस्त्री ,विभावरी संदीप सुकी, राजू मसुरकर ,अरुण भिसे ,पुंडलिक दळवी, आबा मुंज राजेंद्र परुळेकर ,काशिनाथ दुभाषी ,सत्यजित धारणकर ,अशोक दळवी ,अशोक पवार ,साक्षी वंजारी ,सुरेंद्र बांदेकर ,बाबू कुडतरकर ,माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे ,उमेश कोरगावकर, शब्बीर मणियार, उमाकांत वारंग ,चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ ,राघवेंद्र नार्वेकर, नगरसेविका भारती मोरे ,शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, यास्मिन तेजस्वरी, कौस्तुभ गावडे, प्रेमानंंद देसाई, रवींद्र म्हापसेकर, अभय मालवणकर आदी उपस्थित होते.