Monday, April 28, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याएसटी बस खाली चिरडलेल्या "त्या" वृद्धेचा अखेर मृत्यू...

एसटी बस खाली चिरडलेल्या “त्या” वृद्धेचा अखेर मृत्यू…

सावंतवाडीतील घटना;वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट…

सावंतवाडी.ता,१०: येथील नगरपालिके समोर एसटी बसखाली चिरडून झालेल्या अपघातातील त्या महिलेचा अखेर मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.रमाबाई सखाराम सावंत (७०) रा.गोठणवाडी-कोनशी तांबोळी,बांदा असे त्या वृद्धेचे नाव आहे.ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती.अपघातानंतर तिला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मृत झाल्याचे घोषित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments