ग्रामपंचायत सदस्य रविकांत राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन…
माणगाव ता.१०: खोऱ्यातील गोठोस गावात आज ग्रामपंचायत सदस्य रविकांत राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.श्री.प्रकाश मोर्ये,मित्रमंडळ व श्री.रविकांत राऊळ,मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ७५ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले.
“रक्तदान हे जीवनदान आहे”.या रक्तदानाच्या संकल्पनेतून गेली दहा वर्षे श्री.राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात येते.दरम्यान दोन्ही मंडळाचा या शिबिरात मोलाचा वाटा असतो.बरेच रक्तदाते या शिबिरात रक्तदान करून समाधान व्यक्त करतात.हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी लाईफ टाईम हॉस्पिटल,पडवे-कसालचे वैद्यकीय अधिकारी श्री.बावने यांच्या संयुक्त टीमने सहकार्य केले.