वैभववाडी तालुक्यात मोबाईलसेवा कोलमडली

107
2
Google search engine
Google search engine
Google search engine

‘आयडिया’ नेटवर्क गायब; ग्राहकांची गैरसोय

वैभववाडी/पंकज मोरे.ता,१०: तालुक्यात विस्कळीत मोबाईलसेवेमुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. मंगळवारी दिवसभर आयडीया या खाजगी मोबाईल कंपनीचे नेटवर्क गायब होते. त्यामुळे दिवसभर ग्राहकांची खूपच गैरसोय झाली.
वैभववाडी तालुका हा डोंगराळ भागातील दुर्गम तालुका आहे. त्यामुळे संपर्कासाठी व नेटवर्कसाठी मोबाईल सेवेवर अवलंबून राहावे लागते. तालुक्यात बीएसएनएल कंपनी मोबाईल टाॕवर आहेत. मात्र वारंवार विस्कळीत सेवेमुळे ग्राहक त्रस्त आहेत. त्यातच बीएसएनएल बरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागात आयडीया मोबाईल कंपनीने आपले नेटवर्क जाळे केले आहे. सहाजिकच तालुक्यात आयडीया कंपनीचे मोठ्याप्रमाणात ग्राहक आहेत. सुरुवातीला तालुक्यात आयडीयाचे नेटवर्क चांगले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून आयडीया नेटवर्क सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दिवसभर नेटवर्क गायब असल्यामुळे दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झाला.

\