“त्या” अपघातातील बस चालकावर गुन्हा दाखल…

813
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडीत घडला होता अपघात;वृद्धेचा झाला होता मृत्यू…

सावंतवाडी ता.१०: एसटी बसला अपघात घडवून वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी बस चालक स्वदेश गुंडू नाईक (३१) रा.मळेवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा अपघात आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येथील नगरपालिके समोर घडला होता.या अपघातात रमाबाई सखाराम सावंत (७१) रा.गोठणवाडी-कोनशी तांबोळी,बांदा ही वृद्धा गंभीर जखमी झाली होती.दरम्यान येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना “त्या” वृद्धेचा मृत्यू झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की,मृत वृद्धा ही आपल्या घराशेजारील एका वृद्धे समवेत सावंतवाडी आठवडा बाजारात खरेदीसाठी आली होती.दरम्यान रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या सावंतवाडी-पणजी एसटी बसचा तिला अंदाज न आल्याने ती बसच्या खाली कोसळली.यात तिचे दोन्ही पाय एसटी बसच्या मागच्या चाकाखाली चिरडले गेले व दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती.दरम्यान तिला तातडीने उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. यावेळी त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.याबाबत येथील पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\