तीन लाखांच्या मर्यादेपर्यंतची कामे ग्रामपंचायतींना द्या

181
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभेत सदस्यांची मागणी

सिंधुदुर्गनगरी ता १०:
ग्रामपंचायतींना १५ लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कामे आतापर्यंत दिली जात होती मात्र ती आता तीन लाख रुपये मर्यादेपर्यंतची देण्यात यावी अशी मागणी मंगळवारी झालेल्या बांधकाम समिती सभेत सदस्यानी केली. यावेळी सभेच्या सचिव तथा कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनीही त्यास दुजोरा दिला.
जि.प. बांधकाम समितीची सभा मंगळवारी सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सदस्य रवींद्र जठार, श्रेया सावंत, राजेश कविटकर आदी सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायती ना आतापर्यंत पंधरा लाखांपर्यंतची कामे करता येत होती मात्र ही कामे ई निविदेद्वारे करण्याची अट आहे म्हणूनच आता तीन लाख मर्यादेपर्यंतची कामे ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी केली.त्याला कार्यकारी अभियंत्यांनी होकार दर्शविला.
जिल्हा परिषदेच्या शाळा दवाखाने आधी असंख्य ठिकाणच्या जमिनीमध्ये फळझाडे व जंगली झाडे आहेत. ही पण एक जिल्हा परिषदेची मालमत्ता आहे. या झाडांमधून जिल्हा परिषेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. म्हणून या झाडांची नोंद होणे या झाडांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. या कामाची जबाबदारी घेण्यास बांधकाम विभाग आणि कृषी विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकू लागले. मात्र ही मालमत्ता बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याने कृषी विभागाने नोंद व मूल्यांकन करून द्यावे व बांधकाम विभागाने त्यापुढील कार्यवाही करावी असे आदेश बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस यांनी दिले. नडगिवे शाळेचे अपूर्ण बांधकाम पूर्णत्वाकडे गेले आहे. काही किरकोळ कामे बाकी आहेत असे अधिकाऱ्याने सांगताच जर १५ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण झाले नाही तर सोळा डिसेंबरपासून त्या शाळेचे वर्ग जिल्हा परिषदमध्ये भरण्यात येतील असा इशाराही सदस्य रवींद्र जठार यांनी दिला. जीप मालकीचे मालवणचे विश्रामगृह भाडेतत्त्वावर देण्यासाठी दस्ताची प्रथम डागडुजी करावी लागेल त्यासाठी तरतूद करावी लागेल अशी माहिती सभागृहात देण्यात आली.

\