संजू परबांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या…

260
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नितेश राणे; आव्हान मोठे असले तरी कठीण नाही

सावंतवाडी ता.१०: आगामी काळात होणाऱ्या सावंतवाडी पालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष बसला पाहिजे,त्यादृष्टीने कामाला लागा,संजू परब हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत,त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा,असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी आज येथे केले.आपल्या विरोधात तीन पक्ष एकत्र होऊन लढणार आहेत.त्यामुळे आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून श्री.परब यांच्या विजयासाठी एकत्र या,असेही श्री.राणे यावेळी बोलताना म्हणाले.
माडखोल येथे भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी माजी आमदार प्रमोद जठार,राजन तेली, अतुल काळसेकर, संजू परब तालुकाध्यक्ष महेश सारंग, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, माजी सभापती प्रमोद सावंत, आनंद नेवगी, दादू कविटकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.राणे म्हणाले,आपण सर्वांनी एकदिलाने काम केल्यास विजय निश्चित आहे.आपणास आव्हान मोठे आहे.पण ते आपण सर्वांच्या बळावर पार करू शकतो हे निश्चित आहे. म्हणून कामाला लागा,असे श्री.राणे यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने काय केले पाहिजे यांची खात्री करून घ्या,नियोजनबध्द प्रचारयंत्रणा राबवणे गरजेचे आहे.असेही यावेळी राणे यांनी सांगितले.
यावेळी श्री.जठार यांनी प्रत्येक प्रभागनिहाय आढावा घेतला.तसेच कशा पध्दतीने मतदान यंत्रणा राबवण्यात यावी यांची माहिती दिली.तसेच पक्ष सर्व पध्दतीने आपल्या बरोबर असून, चांगले काम करून विजयश्री खेचून आणा,असे आवाहनही श्री.जठार यांनी केले आहे.यावेळी माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर, संजू परब यांनी आपले विचार माडले.
बैठकीला नगरसेविका दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समृध्दी विनोडकर, सत्यवान बांदेकर, महेश धुरी, चेतन आजगावकर, गजानन कोदे, संजना परब, मोहिनी मडगावकर, पल्लवी रेगे, बेला पिटो, निशात तोरसकर, दिनानाथ नाईक, प्रसाद आरविदेकर, दिलीप भालेकर, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

\