क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव…
वेंगुर्ले ता.१० वेंगुर्ले-दाभोली येथील जेष्ठ क्रीडा संघटक अशोक दाभोलकर-मेस्री ह्याना त्यांनी क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेञात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांचा ६७ वा वाढदिवस साजरा करीत सांगली येथे संमेलनाध्यक्ष मेजर वसंत शेजाळ यांचे हस्ते “लोक जागर प्रमुख अतिथी पुरस्कार-२०१९” देऊन गौरविण्यात आले.
पाचवे लोकजागर साहित्य संमेलन २०१९ चे औचित्य साधून हिंगणगांव प्रिमियर लिग शुटिंगबाॅल स्पर्धा दर्गा मैदान, हिंगणगांव, कवठेमहाकाळ, सांगली येथे पार पडली. यावेळी हा पुरस्कार समारंभ पार पडला. त्यावेळी व्यासपिठावर सर्वश्री प्रकाश घडाळेसर, जी. ए. मुजावरसर, प्रा. अनिल पाटीलसर, उपसरपंच अनंत पाटिल, प्रभाकर सपकाळसर, सचिन पाटील, नितिन पाटील, देवानंद लोंढे, महादेव माळी आदी मान्यवर उपस्थित होते.