वेंगुर्ले ता.१० रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊन चार्टर डे साईमंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रिप्रेंझेन्टेटिव्ह अनंत उचगावकर, असिस्टंट गव्हर्नर वसंत करंदीकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, रोटरी प्रेसिडेंट राजेश घाटवळ, डॉ.आनंद बांदेकर, सचिन वालावलकर, इनरव्हील अध्यक्षा सौ.वृंदा गवंडळकर , इव्हेंट चेअरमन डॉ. वसंत पाटोळे आदि मान्यवर यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंटरॅक्ट क्लबने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. वेंगुर्ला मिडटाऊन क्लबच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त, चार्टरचे पुजन क्लबच्या वतीने करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्रेसिडेंट राजेश घाटवळ यांनी केले. संस्थापक सदस्य दिलीप गिरप, संजय पुनाळेकर, गणेश अंधारी, पास्ट प्रेसिडेंट प्रा. आनंद बांदेकर, पीएचएफ सचिन वालावलकर, पणजी दुरदर्शन गायक कलाकार नितीन कुलकर्णी यांचा रोटरी शाल व भेटवस्तू देऊन जेष्ठ रोटरीयन अनंत उचगावकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. रोटरीयन डॉ. वसंत पाटोळे व सौ. स्मिता पाटोळे यांच्या ११ व्या विवाह वाढदिवसानिमित्त, त्यांना शाल, पैठणी व भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ला रोटरी क्लबच्या दहा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत समाधान व्यक्त केले.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रिप्रेंझेन्टेटिव्ह अनंत उचगावकर व असिस्टंट गव्हर्नर वसंत करंदीकर यानी मार्गदर्शनपर शुभेच्छा देवुन, क्लबच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. चार्टर डे निमित्त डॉ. पुजा कर्पे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास रोटरीयन दादासाहेब साळगावकर, पंकज शिरसाट, राजन गावडे, प्रशांत आपटे, रोटरॅक्ट प्रेसिडेंट हेमंत गावडे, स्वप्निल परब, इंटरॅक्ट प्रेसिडेंट सर्जिल कर्जीकर, सानिका नेरुरकर व रोटरी क्लब परीवार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन नितिन कुलकर्णी व आभार प्रा. प्रकाश शिंदे यांनी मानले.
रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन ‘चार्टर डे’ उत्साहात साजरा
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES