…मला हे दत्तगुरू दिसले..!

522
2
Google search engine
Google search engine
Google search engine

किल्ले गगनगडावर दत्त नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

गगनबावडा/पंकज मोरे ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर…सामोरी बसले…मला हे दत्तगुरू दिसले…अशी धारणा उराशी बाळगून बुधवारी लाखो भाविकांनी गगनबावडा येथील गगनगडावर दत्त जन्माच्या अपूर्व सोहळ्याचा आनंद उपभोगला. गगनगड पठार भाविकांनी तुडूंब भरून गेले होते. दिवसभर ‘दिगंबरा दिगंबरा’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
दत्तजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त गगनगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ च्या जयघोषासह ‘दिगंबरा दिगंबरा दत्त गगनगिरी दिगंबरा’ च्या जयघोषाने महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या भाविकांनी गगनगड गर्दीने फुलून गेला आहे. भाविकांचे लोंढे दिवसभर गगनगडाची वाट चढतानाचे दृष्य पाहावयास मिळत होते.
यानिमित्त गगनगडावरील गगनगिरी आश्रमात पहाटेपासून काकड आरती, दर्शन सोहळा व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गगनबावडा पोलिसांनी यानिमित्त चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. गगनबावडा एस.टी आगाराने जादा गाड्या सोडून भाविकांची सोय केली.

\