जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे काम शेर्लेत रोखले…

168
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सरपंच व ग्रामस्थांचा पुढाकार;ग्रामपंचायतीला कल्पना न दिल्याचा आरोप…

बांदा,ता.११:
सासोली ते वेंगुर्ले जाणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम आज शेर्ले सरपंच उदय धुरी व ग्रामस्थांनी रोखले. प्राधिकरण विभागाने स्थानिक ग्रामपंचायतीला कल्पना न देता रस्त्याची खोदाई केल्याचा आरोप धुरी यांना दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता अमित कल्याणकर यांनी येथे येऊन पाहणी केली. त्यावेळी जीवन प्राधिकरण विभागाने ५३ लाख रुपये बांधकाम खात्याकडे भरले नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे जोपर्यंत पैसे भरत नाहीत तोपर्यंत काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाईपलाईनच्या कामामध्ये ज्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते आहेत. त्या रस्त्यांची तोडफोड होणार असल्याने बांधकाम खात्याने जीवन प्राधिकरण कडे १ कोटी ३० लाख रुपये भरण्याचा आदेश दिला होता. त्यापैकी ७७ लाख रुपये प्राधिकरणने बांधकाम खात्याकडे भरणा केली. उर्वरित ५३ लाखांची भरणा केली नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे जोपर्यंत रक्कम वर्ग होत नाही तोपर्यंतच काम बंद ठेवण्याचा आदेश अभियंता कल्याणकर यांनी दिला.
गेले आठ दिवस शेर्ले येथे काम सुरू आहे. यासाठी स्थानिक पंचायतीला देखील कल्पना न देता रस्त्याची खोदाई करण्यात आली. त्यामुळे काम बंद करण्यात आले. यावेळी सरपंच उदय धुरी, शाम सावंत, विराज नेवगी, कामील माडतीस, आनंद चव्हाण, फासकू पावेल, इशद पावेल, अमोल धुरी आदी उपस्थित होते.

\