अत्याधुनिक संगणक व सीसीटीव्ही सेवा होणार ग्राहकांना उपलब्ध…
सावंतवाडी ता.११:
शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या “युनिव्हर्सल सोल्युशन” या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक संगणक व सीसीटीव्ही सेवा पुरविली जाणार आहे.यात कमी दरात दर्जेदार सेवा देण्याचा आपला मानस आहे,असा विश्वास शाखेच्या प्रोप्रायटरांकडून उद्घाटन प्रसंगी व्यक्त करण्यात आला.येथील विठ्ठल मंदिर नजीक असलेल्या दत्तकृपा आपारमेंट मध्ये आज या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
यावेळी शाखेचे प्रोप्रायटर समीर मोरजकर,निलेश शेटकर,योगेश गोवेकर आदींसह विष्णू मोरजकर,गोपाळ मोरजकर यतीन टोपले आदी उपस्थित होते.या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना संगणक,प्रिंटर,लॅपटॉप,सीसीटीव्ही व इतर इलेक्ट्रॉनिक्स ॲक्सेसरीज आदी सेवा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांना आता हक्काचे दालन उपलब्ध होणार आहे.तरी ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन शाखेच्या प्रोप्रायटरांकडून करण्यात आले आहे.