Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
निलेश राणेंची टिका;भावनिक मुद्दयावर नको विकासाच्या मुद्यावर लढा..
सावंतवाडी.ता,१२:
पाच वर्षे आपल्याकडे गृहखाते असताना दीपक केसरकर आमचा कोणताही दहशतवाद दाखवू शकले नाहीत. मात्र आता निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ते पंधरा दिवस आमच्यावर दहशतवादाचा आरोप करतील.राणेंच्या विरोधात बोलायची एकही संधी ते सोडत नाहीत असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे केला.
दरम्यान केसरकर यांनी नेहमी रडून मते मागण्याचे काम केले आहे. मात्र आता भावनिक मुद्द्यावर निवडणुका होणार नाही. तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लोकांना सामोरे जाऊ असेही त्यांनी सांगितले.
भाजपाचे उमेदवार संजू परब उमेदवारी अर्ज करण्यासाठी आलेल्या निलेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी आमदार नितेश राणे संदीप कुडतरकर संजू परब महेश सारंग अतुल काळसेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री राणे म्हणाले याठिकाणी परब यांना अधिकृत पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.आम्ही या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर सामोरे जाणार आहोत त्यामुळे काही झाले तरी आमचाच विजय होणार आहे.यावेळी नितेश राणे म्हणाले मुद्द्यावर विकास होत नाही.ज्याप्रमाणे कणकवली वैभववाडी चा विकास झाला. त्याठिकाणी विविध प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे येथे प्रकल्प होणे गरजेचे होते.मात्र गेल्या अनेक वर्षात याठिकाणी कोणताही प्रकल्प आलेला नाही.त्यामुळे याचा फटका येथील स्थानिक जनतेला बसला आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाचा मुद्दा पुढे करून आम्ही लोकांना सामोरे जाणार आहोत.काळसेकर म्हणाले बांदा ते चांदा अशी मोहीम भाजपाकडून आम्ही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात बांदया
पासून केली आहे.
आता सावंतवाडीत पुन्हा एकदा विजय संपादन करू.यावेळी आपल्यावर टाकलेला विश्वास नक्कीच सार्थकी लावू असा विश्वास उमेदवार परब यांनी व्यक्त केला.
Download WordPress Themes Nulled and plugins.