रावजी यादव यांची माहीती;चुकीच्या पद्धतीने निधी गोळा केल्याचा आरोप….
ओरोस ता १२ :
डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्थापित दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या नावाचा नोंदणी क्रमांकाचा अनाधिकारे वापर करणाऱ्या संस्थेवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी गंगाराम यादव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
२० मे २०१५ रोजी मालवण आचरा फेस्टीवल साजरा करण्यासाठी विश्वनाथ शिवराम कदम खोटलेकर आणि इतर १५ जणांनी मालवण फेस्टीवल आयोजन समिती या नावाने सिंधुदुर्ग सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडून मान्यता घेतली. परंतू या नावावर जनता निधी देणार नाही म्हणून बेकायदेशीरपणे डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्थापित दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया त्या भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मीराताई आंबेडकर यांचे नाव छापले. जनता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने निधी देतील म्हणून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून मोठ्या प्रमाणात पावत्या छापून जनतेकडून निधी गोळा केला. त्याविरोधात भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी गंगाराम यादव यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे यांच्याकडे २० मे २०१५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्याची सखोल चौकशी केल्यावर चौकशीत ही मंडळी दोषी असल्याचे सिद्ध झाले म्हणून दोषींवर फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी कोल्हापूर धर्मादाय आयुक्तांकडे केल्याची माहिती भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी गंगाराम यादव यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.