अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी…

164
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग मधील घटना; गुन्ह्यात संशयितासह सहकारी महिलेचा समावेश…

ओरोस ता.१२:
दोडामार्ग तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लागल्या प्रकरणी याच तालुक्यातील मेढे-हरिजनवाडी येथील सोमा उर्फ भूषण खेमा कांबळे (वय २५) याच्यासह त्याला सहकार्य करणाऱ्या  त्याच्या नातेवाईक  महिलेला येथील विशेष न्यायलयाचे न्यायाधीश प्रकाश कदम यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.कांबळे याच्यावतीने वकील अश्पाक शेख यांनी काम पाहिले.
        सदर अल्पवयीन मुलगी व संशयित कांबळे हे नातेवाईक असून २७ नोव्हेंबर २०१७ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत त्याने आपल्या राहत्या घरात तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. त्यात ती गरोदर राहिली. याबाबत राज्य शासन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जगदीश आनंदराव मोरे (वय ५६) रा. मनवीत बंगला,ज्ञानकुंज कॉलेज जवळ, ओरोस ता. कुडाळ यांनी ७ डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दिली होती.
      त्यानुसार मुख्य संशयित आरोपी सोमा कांबळे याच्यावर भादवि कलम 376 (2), (एन), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12, 17 सह 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिला आरोपीवर 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कांबळे याला ८ डिसेंबर रोजी तर महिलेला ९ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.सोमवार ९ रोजी या दोघांनाही  न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी या दोघांनाही १२ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.ही पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी न्यायालयात हजर केले असता  न्यायालयाने या दोघांनाही न्यायालायीन कोठडी सुनावली आहे.
\