आजारावर मात करून निरोगी आयुष्य जगणे ही खरी प्रगती

247
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 प्रशांत कोलते; करुळ येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

 

वैभववाडी/प्रतिनिधी आजारातून मुक्ती हवी असेल तर व्यायाम खूप महत्वाचा आहे. तरुण व्हायचं असेल तर प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे. इतर आजाराच्या तुलनेत मधुमेह व ह्रदयविकार हे आजार धोकादायक आहेत. रुग्ण संख्या वाढ हे प्रगतीचे लक्षण नाही. तर आजारावर मात करून निरोगी आयुष्य जगणे ही खरी प्रगती आहे. असे प्रतिपादन फुफ्फुसरोगतज्ञ डॉ. प्रशांत कोलते यांनी व्यक्त केले.

करुळ गावठण येथे कोलते हॉस्पिटलच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबीर पार पडले. दत्त देवस्थान मंडळाच्या वतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रशांत कोलते, मंडळाचे अध्यक्ष मंगेश घाडी, विकास कोलते, बाळा कदम, बबन डकरे, सुरेश मनवे, शिक्षक नवनाथ सगरे, संतोष सावंत, दत्ताराम साटम, अशोक कोलते, बाळासाहेब कोलते, रमेश पांचाळ, ताई व्हणाले, व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. प्रशांत कोलते म्हणाले, आज डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरून व्यायामाचे महत्त्व व संदेश समाजाला देत आहेत. गावामधील या मोफत शिबीराची तयारी आम्ही महिनाभरापासून करत असतो. शिबीराच्या माध्यमातून आम्ही आमची बांधिलकी, जबाबदारी निभावत आहोत. डॉ. दर्शना कोलते व हॉस्पिटलचे कर्मचारी यांचेही शिबीरात मोठे योगदान आहे. दिगंबर पाटील, बाळा कदम, मंगेश घाडी यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबीराला डॉ. प्रशांत कोलते व डॉ. दर्शना कोलते यांनी १९० रुग्णांची तपासणी करत यांना मोफत औषध पुरवठा केला. गावात येवून वयोवृद्ध रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ. कोलते उभयतांचे करुळवासियांनी आभार मानले. तसेच मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मधुमेह तपासणीस श्री राजेश व हॉस्पिटलचे कर्मचारी अनिल वनकर, एकनाथ आचरेकर, मनिषा परब, निलम तळावडेकर यांचे शिबीराला विशेष परिश्रम लाभले.

फोटो- करुळ येथे मोफत आरोग्य शिबीरावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत कोलते. सोबत उपस्थित पदाधिकारी.

\