सावंतवाडी येथे इनोवा-दुचाकीत अपघात…

377
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१३:  येथील भांगले पेट्रोल पंप समोर इनोवा व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात कुणकेरी येथील दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे.हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.दरम्यान इनोव्हा चालकाने त्याला प्राथमिक उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दुचाकी चालकाच्या पायाला व हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. तर इनोवाच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली.व जखमीला रुग्णालयात पाठविण्यासाठी सहकार्य केले.

\