सावंतवाडीत राष्ट्रवादीचा,अपक्ष उमेदवार बबन साळगावकरांना पाठिंबा..?

282
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सकारात्मक चर्चा, महा आघाडी न झाल्यास सहकार्य करण्याचा पक्षाचा निर्णय

कुडाळ ता.१३: सावंतवाडी येथील नगरपरिषदेत महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मात्र तुर्तास राष्ट्रवादीकडून अर्ज भरलेल्या पुंडलिक दळवी यांचा उमेदवारी अर्ज ए.बी फॉर्म अवैध ठरल्यामुळे आता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना पक्षाकडून पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.यावेळी त्या ठिकाणी महाविकास आघाडी करण्यावर चर्चा झाली.परंतु काँग्रेस शिवसेना आपले उमेदवार उभे केल्यामुळे त्याठिकाणी अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या श्री.साळगावकर यांना पाठिंबा देण्याबाबत पक्षाकडून चर्चा सुरू असल्याचे समजते.
पुंडलीक दळवी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे त्याठिकाणी साळगावकर यांना पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.श्री.साळगावकर यांनी विधानसभा निवडणूक आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला.परंतु विधानसभेत त्यांना अपयश आले.मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष म्हणून आपला अर्ज नगराध्यक्षपदासाठी भरला आहे.महाआघाडी होण्याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे.त्यामुळे आत्ताच काही सांगता येणार नाही,असे पक्षाच्या वरिष्ठांचे म्हणणे आहे.मात्र महाविकास आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी श्री.साळगावकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

\