“कॅम्प वीथ द चॅम्प” शिबीराच्या माध्यमातून नवोदित खेळाडू घडतील…

209
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शुभंकर भट्टाचार्य; सावंतवाडीत इंडीयन ऑईलकडुन उन्हाळी शिबीराचे आयोजन…

सावंतवाडी ता.१३: विविध क्षेत्रात चमकणा-या नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळता यावे यासाठी इंडियन ऑइल या कंपनीच्या माध्यमातून “कॅम्प वीथ द चॅम्प” या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या उन्हाळी शिबीराच्या माध्यमातून नक्कीच नवोदित खेळाडू घडतील.असा विश्वास कार्पोरेशनचे अधिकारी दिपांकर भट्टाचार्य यांनी आज येथे व्यक्त केला.
इंडियन ऑइल या कंपनीच्या माध्यमातून सावंतवाडीत पाच दीवसाच्या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबत माहिती देण्यासाठी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत कंपनीचे एम.आर.दास, ग्रँड मास्टर सौम्या स्वामीनाथन, टेबल टेनिसची राष्ट्रीय खेळाडू रिया रेषा ,तीन वेळा जागतिक चॅम्पियन योगेश परदेशी, बॅडमिंटनपटू दिपाशंकर भट्टाचार्य, रणजी क्रिकेटचे खेळाडू मंदार फडके,मयुर कबरे,उदय बेडेकर,बुध्दीबळच्या स्मिता गोविलकर, इंडियन ऑइलच्या श्रीमती अंजली भावे, योगेश फणसळकर आदी उपस्थित होते.
यावेळी भट्टाचार्य म्हणाले,येथील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.त्याचा फायदा भविष्यात मुलांना त्यासाठी पाच दिवसाचे उन्हाळी कॅम्प आयोजित करून आम्ही त्या मुलांना पुढेआणण्या साठी प्रयत्न करत आहोत.या कॅम्पला रणजी तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू भेटी देणार आहेत त्यामुळे आपसूकच नवोदित खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.पाच दिवसाच्या कॅम्पमध्ये आम्ही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करून परंतु ज्या खेळाडूंना त्यानंतरही मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.अशा खेळाडूंना आम्ही ऑनलाइन मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली आहे.कारपोरेशन च्या माध्यमातून विविध प्रकारच्या स्कॉलरशिप फायदा येथील विद्यार्थ्यांना व नवोदित खेळाडूंना व्हावा,अशी आमची अपेक्षा आहे.त्यामुळे याचा फायदा पालकांनी आपल्या मुलांसाठी घ्यावा तसेच जिल्ह्यातील मुलांनी आपल्या टॅलेंट राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करावे,असे आव्हान भट्टाचार्य यांनी केले.

\