सावंतवाडीत चालत्या रेल्वेला आदळून वयोवृद्ध महिला गंभीर

1011
2
Google search engine
Google search engine
Google search engine

चेहऱ्यावर गंभीर दुखापत; अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविले…

 

सावंतवाडी ता.१३: येथील मळगाव रेल्वे स्टेशनवर चालत्या रेल्वेला आदळून वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.सुनिता शांताराम राऊळ(७०) रा.नेमळे-माणिकचौकवाडी,असे त्या वृद्धाचे नाव आहे.ही घटना आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.अपघातानंतर तिला १०८ रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान तिच्या नाकाला गंभीर दुखापत असल्याने अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी सावंतवाडी रुग्णालयात धाव घेत जखमींच्या नातेवाईकांना मदत केली.

\