अपघात झाल्याच्या रागातून टेम्पो चालकाला “फिल्मीस्टाइल” मारहाण

2

सावंतवाडीतील घटना;मारहाण करणा-या युवकाच्या विरोधात नागरीक आक्रमक

 

सावंतवाडी ता.१३: नातेवाईक महिलेला अपघात झाल्याच्या रागातून शहरातील एका युवकाने टेम्पो चालकाला “फील्मीस्टाईल” बेदम मारहाण केली.हा प्रकार आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास येथील तीन मुशी परिसरात घडला.या मारहाणीत संबंधित टेम्पो चालक जखमी झाला आहे.त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान हा प्रकार सुरू असताना त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली.व मारहाण करणाऱ्या युवकाच्या विरोधात जोरदार आगपाखड केली.संबंधित टेम्पो चालकाला मारहाण करणे चुकीचे आहे,असे शिवसेनेच्या नगरसेविका भारती मोरे यांनी सांगितले.यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या महिलांनी त्या युवकाला जाब विचारला,मात्र आपल्या नातेवाईक मिळालेल्या अपघात केल्याच्या रागातून आपण त्याला मारहाण केली,असे त्यांनी सांगितले.हे प्रकरण पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.घटनास्थळी मोठी गर्दी झाल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

6

4