आमचे घरगुती संबंध असल्यामुळे पाठीशी;शामकांत काणेकरांचा दावा…
सावंतवाडी ता.१४: भाजपशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांना भाजपचे कोअर कमिटीचे सदस्य शामकांत काणेकर यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.आपले व कोरगावकर यांचे गेले अनेक वर्षापासून अत्यंत घरगुती संबंध असल्यामुळे,तसेच कोरगावकर या गुरु मठातील कन्या असल्यामुळे त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू,असा विश्वास श्री.काणेकर यांनी व्यक्त केला आहे.
आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दरम्यान श्री.काणेकर यांनी आपली हजेरी लावल.त्यांच्या या उपस्थितीमुळे कोरगावकर यांच्यासोबत जुन्या भाजपची मंडळी आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.दरम्यान काणेकर यांनी आपण घेतलेली पक्षाची भूमिका नसून आपण वैयक्तिकरित्या कोरगावकर यांच्या
पाठीशी ठामपणे उभे आहे,असे त्यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे कोरगावकर यांच्या पाठीशी जुने भाजपाचे सदस्य राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्री.काणेकर हे जिल्ह्यातील जुने भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक पक्षांची पदे भूषविली आहेत. त्यांना मानणारा जिल्ह्यात एक वर्ग आहे.त्यामुळे श्री.काणेकर यांचा फायदा कोरगावकर यांना कितपत होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.