अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ…

158
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी.ता,१५; 

वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुन रावराणे विद्यालय व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे शनिवार दिनांक १४ रोजी पासून वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला. इ.५वी ते १२ वी चे सर्व विद्यार्थी या क्रीडा महोत्सवात सहभागी झाले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कबड्डी, खो-खो, क्रिकेट, रस्सीखेच अशा क्रीडा प्रकारांचा या महोत्सवात समावेश आहे. प्रशालेचे प्राचार्य श्री. बी. एस. नादकर व शिक्षक श्री. एस. बी. शिंदे एस यांनी श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ केला. संस्था अधिक्षक श्री. जयेंद्र रावराणे यांनी विद्यार्थ्यांना उत्स्फुर्तपणे सहभाग घेण्याचे आवाहन केले. व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक श्री.तुळसकर यांनी शालेय जिवनात खेळांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले . यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते. मोठ्या उत्साहात क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला.

\