Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी भाजपाचा उद्या तालुका कार्यकर्ता मेळावा...

सावंतवाडी भाजपाचा उद्या तालुका कार्यकर्ता मेळावा…

राणे,जठार,तेलींची उपस्थिती; नगराध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजन…

सावंतवाडी ता.१५: येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षवाढीसाठी उद्या सकाळी ११ वाजता येथील मातृछाया सभागृहात कार्यकर्ता मेळावाआयोजित करण्यात आला आहे.यावेळी खासदार नारायण राणे,जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व प्रदेश सरचिटणीस राजन तेली उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन श्री.परब यांनी यावेळी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments