सावंतवाडी कळसुलकर इंग्लिश स्कूलला १ लाखाची मदत…

451
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माजी विद्यार्थ्यी दिनेश पांगम यांचा पुढाकार;सोसायटीच्या पदाधिका-यांकडे सुपुर्द…

सावंतवाडी ता.१५: येथील कळसुलकर न्यू इंग्लिश स्कूल संचलित,सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीला माजी विद्यार्थी संघाचे सहकार्यवाह तथा रिझर्व्ह बँकेचे माजी अधिकारी दिनेश पांगम यांनी एक लाख रुपयांचा धनादेश देणगी स्वरुपात दिला.श्री.व सौ.पांगम यांची कन्या सौ.रोहिणी सुधीर कोकाटे पूवाँश्रमीच्या सौ.रोहिणी दिनेश पांगम यांच्या स्मरणार्थ ही देणगी देण्यात आली.
सौ.कोकाटे ह्या उत्तम चित्रकार होत्या.फाईन आटँ मधील पदविका संपादन केलेल्या सौ.कोकाटे यांच्या स्मणाथँ चित्रकलेच्या क्षेत्रात यश मिळविणा-या विद्यार्थ्यांना गौरविण्यासाठी आणि संस्थेचा काँपस फंड उभा करण्यासाठी ही देणगी दिल्याचे श्री.पांगम यांनी सांगितले.
28 व 29 डिसेंबरला कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये माजी विद्यार्थी महामेळावा आयोजित केला आहे. त्या पाश्वँभूमीवर श्री.पांगम यांनी दिलेला हा धनादेश माजी विद्यार्थी संघाचे ओंकार तुळसुलकर यांनी संस्थाध्यक्ष शैलेश पै यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी संस्था सचिव डाँ.प्रसाद नावेँकर, किशोर चिटणीस, मयुर मिशाळ, माजी विद्यार्थी संघाचे राजू केळुस्कर उपस्थित होते.

\