कोल्हापूरचा पृथ्वीराज डांगे, नागपूरची हिमानी फडके वेगवान जलतरणपटूच्या मानकरी…

206
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नागपूर, कोल्हापूर, नाशिक, मुंबईचे वर्चस्व…

मालवण, ता. १५ : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच समुद्रात आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या गटात कोल्हापूरच्या पृथ्वीराज डांगे तर महिलांच्या गटात नागपूरच्या हिमानी फडकेने वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष बाबा परब, सचिव राजेंद्र पालकर यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, बबन शिंदे, मंदार केणी, यतीन खोत यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. पारितोषिक वितरण समारंभास माजी खासदार नीलेश राणे यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी अशोक सावंत, पूजा सरकारे, पूजा करलकर, ममता वराडकर, दीपक पाटकर, परशुराज पाटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असा- २ किलोमीटर दिव्यांग- सिद्धी भांडारकर (नाशिक), अंजना प्रधान (नाशिक) ३ किलोमीटर १३ ते १५ वर्षे वयोगट- संजना जोशी (नागपूर), सानिका कवडे (नागपूर), नाईशा व्होरा (मुंबई), २ किलोमीटर ११ ते १२ वर्षे वयोगट- वैष्णवी अहेर (नाशिक), क्षितिजा किरगत (सोलापूर), श्रावणी गोडख (नाशिक), ३ किलोमीटर २५ ते ३५ वर्षे वयोगट- सोनाली वेंगुर्लेकर (बेळगाव), अनिता म्हात्रे (रायगड), सोनाली पतमसे (नागपूर), २ किलोमीटर दिव्यांग- आदेश रुकडीकर (कोल्हापूर), ताहीर मुलानी (कोल्हापूर), प्रणव लोहाळे (नागपूर), ३ किलोमीटर ४६ ते ५५ वर्षे वयोगट- सुखजीत कौर (मुंबई), गायत्री फडके (पुणे), प्रीती चव्हाण (मुंबई), पाचशे मीटर ६ ते ८ वर्षे वयोगट- वेदांत मिसळे (बेळगाव), अद्वैत दळवी (बेळगाव), मैत्रेय सावंत (मुंबई), ३ किलोमीटर १३ ते १५ वर्षे वयोगट- आदित्य हिप्परगी (सोलापूर), अश्‍विन जैस्वाल (मुंबई), प्रथम गडाख (नाशिक), ३ किलोमीटर २५ वर्षे ते ३५ वर्षे वयोगट- सिद्धार्थ गर्ग (पुणे), क्षितिज बेलापूर (सातारा), जुनैद खान (नाशिक), १ किलोमीटर ८ ते १० वर्षे वयोगट- आदित्य गर्ग (ठाणे), अनिष चव्हाण (ठाणे), सुमेधा कुलकर्णी (नाशिक), १ किलोमीटर गतीमंद- जिया रॉय (मुंबई), पूजा विरा (मुंबई), सानिका वैद्य (ठाणे), ५ किलोमीटर २० ते २५ वर्षे वयोगट- मयांक चाफेकर (ठाणे), प्रज्ज्वल वाघ (कोल्हापूर), स्वप्नील गोडसे (सातारा), ५ किलोमीटर २० ते २५ वर्षे वयोगट- सुबीया मुलानी (कोल्हापूर), निकिता प्रभू (कोल्हापूर), सृष्टी कोनसावलीकर (नांदेड), ३ किलोमीटर ४६ ते ५५ किलोमीटर- संजय जाधव (सांगली), श्रीमंत गायकवाड (सातारा), प्रकाश वराडकर (सिंधुदुर्ग), ३ किलोमीटर ३६ ते ४५ वर्षे वयोगट- संदीप भोईर (रायगड), किरण पावेकर (सातारा), सुरेश मिथाकोल (सोलापूर), ३ किलोमीटर १३ ते १९ किलोमीटर- पृथ्वीराज डांगे (कोल्हापूर), स्मित डोर्लेकर (नागपूर), वीरधवल पाटील (कोल्हापूर), ६ ते ८ वर्षे वयोगट- अहिका हलगेकर (बेळगाव), शिवानी कुर्धा (पुणे), आयाना पटेल (नाशिक), २ किलोमीटर ५६ वर्षे वयोगटावरील- कल्लाप्पा पाटील (बेळगाव), सुभाष बर्गे (पुणे), सतीश कदम (सातारा), ५ किलोमीटर ३६ ते ४५ वर्षे वयोगट- उत्तरा पेठणे (नाशिक), गौरी पांडे (नाशिक), ५ किलोमीटर १५ ते १९ वर्षे वयोगट- हिमानी फडके (नागपूर), योगेश्‍वरी कदम (सांगली), अस्मिता म्हाकवे (कोल्हापूर), २ किलोमीटर ११ तेे १२ वर्षे वयोगट- नील वैद्य (रायगड), वेदांत गडख (नाशिक), मयांक धामणे (नाशिक), २ किलोमीटर ५६ वर्षावरील- वर्षा कुलकर्णी (सांगली), नसीम भालदानी (मुंबई), सोनल पाटील (मुंबई), ८ ते १० वर्षे वयोगट- नैशी रूहील (मुंबई), अनुषा दळवी (मुंबई), अनन्या बिरंजे (मुंबई), १ किलोमीटर गतीमंद- दक्ष फडके (नागपूर), चिन्मय फाटक (पुणे), ओम जुवाली (बेळगाव)

\