वाभवे-वैभववाडी नगराध्यक्ष पदाची निवडणूक २४ डिसेंबर रोजी

109
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता.१५:  नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पदाची निवडणूक मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी १०ते २ वा. पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करणे. दुपारी २ वा. छाननी, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची नावे व ती फेटाळण्याची कारणे सूचना फलकावर प्रसिद्ध करणे. शुक्रवार दिनांक २०रोजी नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांनी अपील पत्र दाखल करणे. तसेच वैद्यरित्या नामनिर्देशन केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे. सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेणे. मंगळवार दिनांक २४रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची नावे घोषित करणे. व दुपारी १२.१५ वाजता आवश्यकता असल्यास नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान व निकाल घोषित करणे असा कार्यक्रम आहे. विद्यमान नगराध्यक्षा सौ दीपा गजोबार यांनी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार राजीनामा दिला होता. त्यामुळे नगराध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती.
वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपा पक्षाची एकहाती सत्ता आहे. नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलासाठी राखीव आहे. या पदासाठी भाजपा नगरसेविका समिता कुडाळकर, अक्षता जैतापकर व मनीषा मसुरकर या या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. यापैकी पक्षश्रेष्टी कोणाची नगराध्यक्ष पदासाठी निवड करणार याची उत्सुकता वैभववाडीवासिंयांना लागली आहे.

\