कणकवली भाजपचा १८ डिसेंबरला मेळावा…

116
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राजन चिके;राणे घेणार तालुका, जिल्हा निवडणुकीचा आढावा…

कणकवली, ता.१६: कणकवली तालुका भाजप संघटनेचा मेळावा बुधवारी (ता.१८) दुपारी १२ वाजता भगवती मंगल कार्यालय येथे होणार आहे. यात तालुका आणि जिल्हा कार्यकारीणी संघटनात्मक निवडणुकीचा आढावा खासदार आणि भाजप नेते नारायण राणे घेणार आहेत. याखेरीज तालुक्यात रखडलेल्या विकासकामांबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष राजन चिके यांनी आज दिली.
भाजपच्या तालुका मेळाव्याबाबतची माहिती श्री.चिके यांनी आज येथील भाजप कार्यालयात दिली. यावेळी जिल्हा महिला संघटक राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण, शिशिर परुळेकर, परशुराम झगडे, बबलू सावंत आदी उपस्थित होते.
श्री.चिके म्हणाले, भाजपच्या संघटनात्मक मेळाव्याला खासदार श्री.राणे यांच्यासह आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी खासदार नीलेश राणे, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आदी उपस्थित राहणार असल्याचेही चिके म्हणाले.

\