आदर्श विद्या मंदिर भुईबावडा विद्यालयाचे स्नेहसंमेलन २२ रोजी

2

वैभववाडी.ता,१६:  आदर्श विद्या मंदिर भुईबावडा विद्यालयाचे सन १९९०-९१ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी १२. वाजता शिरोडकर हायस्कूल परळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.
तब्बल २८ वर्षानी हे विद्यार्थी एकमेकांच्या भेटी घेणार आहेत. या स्नेह संमेलन सोहळ्याला शाळेचे तत्कालीन वर्गशिक्षक श्री. दुकान, श्री. मालुसरे उपस्थित राहणार आहेत.
‘क्षण विखुरलेली पुन्हा वेचूया, बाल सवंगड्यांबरोबर हसूया, भरभरून बोलूया’ या संकल्पनेखाली सर्व विद्यार्थी एकत्र येणार आहेत. या स्नेहसंमेलनाला सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनीनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रमोद देसाई, जगदीश चव्हाण, महेश चव्हाण यांनी केले आहे.

5

4