राजश्री धुमाळे यांचा इशारा;अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन…
कणकवली, ता.१६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनुद्गार काढणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. त्यांनी दोन दिवसांत माफी न मागितल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे यांनी आज दिला. सौ.धुमाळे म्हणाल्या, राहुल गांधींच्या निषेधाचा ठराव आज आम्ही तालुका संघटनेच्या बैठकीत घेतला आहे. गांधी यांनी रेप इन इंडिया असेही चुकीचे वक्तव्य केले आहे. त्याबाबतही त्यांनी संपूर्ण देशवासीयांची माफी मागायला हवी. पुढील दोन दिवसांत त्यांनी आपला माफीनामा सादर न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचेही सौ.धुमाळे म्हणाले.